Devendra Fadnavis: शिंदे सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीज तोडणीबाबत घेतला मोठा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis: शिंदे सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीज तोडणीबाबत घेतला मोठा निर्णय

खरीप व रब्बीवर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे गणित अवलंबून असते. त्यातच उत्तर पूर्व भागात तर फक्त नोव्हेंबर ते जानेवारी या काळातच विहिरींचे पाणी पिकांना देण्याची गरज पडते. मात्र वीज कंपन्यांकडून शेतकऱ्यांची वीज तोडली जात होती. पण आता ज्या शेतकर्‍यांनी शेतीपंपाचे चालू बिल भरले आहे अशा शेतकर्‍यांच्या वीजजोडण्या कापू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही काळ का होईना पण दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये महावितरण कंपनी कडून वीजबिल न भरलेल्या शेतकऱ्यांच्या कृषीपपांचे कनेक्शन कापले जात आहे. या कारवाईमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून या कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. पावसामुळे शेतकरी पुर्णपणे मेटाकूटीला आला आहे.

हेही वाचा- गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

मात्र शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळं राज्यातील शेतकऱ्यांना काही काळ दिलासा मिळणार आहे. बील वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याची व व्यक्तीगत असणार्‍या छोट्या डीपी काढून नेण्याची मोहीम महावितरणने हाती घेतल्याने ऐन हंगामात शेतकरी अडचणीत सापडला आहे. अस्मानी आणि सुल्तानी संकटाने गेल्या काही वर्षात शेतकरी आर्थिक अडचणीत आला असताना आता नवे संकट उभे राहिले आहे.