.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई: महाराष्ट्र राजपत्र नागरी सेवा एकत्रित पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. आयोगाने गुरुवारी एक बैठक घेतली. ज्यामध्ये 25 ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यावर आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. दोन दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे.