Sambhaji Bhide Controversy : भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया म्हणाले, 'अशा वक्तव्यामुळे संताप...'

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यातील राजकारण तापलं आहे
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर टीका केली त्यानंतर राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. राज्यभरात भिडेंविरोधात संतापाची लाट पसरली आहे. काँग्रेस आणि आंबेडकरवादी संघटनांनी भिडे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे.

विधानसभेतही भिडेंच्या वक्तव्याचे संतप्त पडसाद उमटले. भिडे यांना अटक करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. भिडेंचं हे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत असतानाच त्यांनी अजून एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधी यांच्यानंतर भिडे यांनी थेट स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली आहे.

यावर विरोधक सत्ताधारी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तर भिडे यांच्या या वक्तव्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'संभाजी भिडे यांनी जे वक्तव्य केलंय त्याचा मी निषेध करतो. महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. स्वातंत्र्याच्या इतिहासाचे ते महानायक आहेत. अशा महामानवाबाबत बोलताना संयम पाळला पाहिजे. त्यांनी केलेलं विधान पूर्णपणे चुकीचं आणि निषेधार्ह आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis
Accident News: भरधाव ट्रकची कारला धडक; अपघातात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसासह आणखी एकाचा जागीच मृत्यू, २जण जखमी

'अशा प्रकारचे वक्तव्य भिडे यांनी किंवा अन्य कोणीही करू नये. कारण करोडो लोकांचा अशा वक्तव्यामुळे संताप तयार होतो. लोक महात्मा गांधी यांच्याबद्दल असं बोलणं कधीही सहन करून घेणार नाहीत. तर यासंदर्भात जी उचित कारवाई करायची आहे ती राज्य सरकारकडून केली जाईल. महात्मा गांधी असतील किंवा वीर सावरकर असतील, कोणाबाबतही अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत', असंही फडणवीस म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis
Sambhaji Bhide Controversy : भिडेंविरोधात राज्यभरात संतापाची लाट; वाशिममध्ये जाण्यासाठी बदलावा लागला मार्ग कारण....

तर पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, संभाजी भिडे यांचा आणि भाजपचा काहीही संबध नाही. ते वेगळी संघटना चालवतात. त्यांच्या या वक्तव्यांना राजकीय रंग देण्याचं काही कारण नाही. ज्याप्रमाणे काँग्रेसचे नेते या प्रकरणाचा निषेध करत आहेत. त्याप्रमाणेच जेव्हा राहुल गांधी स्वा. सावरकर यांच्याबाबत बोलतात तेव्हा त्याचाही निषेध काँग्रेस पक्षातील नेत्यांनी करायला हवा, पण त्यावेळी ते मिंधे होतात, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com