esakal | Sakinaka rape case: मुख्यमंत्र्यांनी जातीनं लक्ष द्यावं; फडणवीसांची प्रतिकिया
sakal

बोलून बातमी शोधा

fadanvis

Sakinaka rape case: मुख्यमंत्र्यांनी जातीनं लक्ष द्यावं

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या साकीनाका येथे बलात्कार (Sakinaka rape case) झालेल्या पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. अत्यंत अमानुष पद्धतीने महिलेवर अत्याचार करण्यात आला. यावर आता राज्यासह देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (chief minister uddhav thackeray) यांनी स्वत: जातीनं लक्ष देऊन विशेष जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी प्रयत्न करावे तसेच लवकरात लवकर नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

मुंबईच्या लौकीकाला काळीमा फासणारी घटना

माणुसकीला काळीमा फासणारी आणि मन सुन्न करणारी ही घटना आहे. मुंबईच्या लौकीकाला काळीमा फासणारी घटना असून महिलांना आता असुरक्षिततेची भावना निर्माण होतेय. या प्रकरणी नराधमांना फाशी झालीाच पाहिजे. गेल्या महिनाभरात राज्यात बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून पुण्याला, नागपूर, पालघरला महिलांवरील अत्याचाराच्या भयानक घटना घडल्या. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना विनंती आहे की, त्यांनी याप्रकरणी जातीनं लक्ष द्यावं, मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टीसशी बोलावं आणि विशेष जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) हा खटला लवकरात लवकर चालविण्यात यावा. राज्य सरकारकडून या प्रकरणी केवळ आश्वासने नको कारवाई करण्याची मागणी यावेळी फडणवीसांनी केली आहे.

हेही वाचा: आपल्या राज्यात चाललय काय? साकीनाका घटनेवर तृप्ती देसाईंची संतप्त भावना

पोलीस दलातील बदल्यांवर फडणवीसांचा गंभीर आरोप

नुकत्याच राज्यातील पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या यावर फडणवीसांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मनाला वाटेल तिथे अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. नेमकं पोलीस विभागात काय चाललयं हे कळत नाही. पत्रकारांनी यावर प्रश्न विचारले असता, ते म्हणाले आयपीएस अधिकारी मंत्र्यांऐवजी मला का भेटतात यावर सरकारनं चिंतन करावं

हेही वाचा: Sakianaka rape case : बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू

loading image
go to top