ठाकरेंची भेट, धीरेंद्र शास्त्रींचं वादग्रस्त विधान ते आमदार गायकवाड; फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

CM Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर असून त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
devendra fadnavis

devendra fadnavis

esakal

Updated on

नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नागपुरमध्ये बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया दिली. धीरेंद्र शास्त्रींनी हिंदूंना ४ मुलं जन्माला घालावी आणि १ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यावं असं विधान केलं होतं. तसंच छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते आणि रामदास स्वामींना त्यांनी राजपाट सांभाळावा अशी विनंती केली होती असंही म्हटलं होतं. यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com