Devendra Fadnavis: मराठा समाजाची नाराजी की लोकनेता दाखवण्याची इच्छा? फडणवीसांच्या राजीनामास्त्रच्या मागची इनसाईड स्टोरी काय?

Devendra Fadnavis offers to resign: देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेमागची इनसाईड स्टोरी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत सकाळच्या वरिष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी काही मुद्दे मांडले.
Devendra Fadnavis Resignation
Devendra Fadnavis Resignationesakal

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील भाजपच्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. एवढेच नाही तर राज्यातील पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत महाराष्ट्र सरकारच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव दिल्यानंतर आता महाराष्ट्र भाजप अंतर्गत राजकारण देखील उफाळून आलं आहे. महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाला, भाजपच्या दिग्गज नेत्यांचा देखील लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. या पराभवापेक्षा महाराष्ट्रात देवेंद्र फडणीवस यांची भूमिका चर्चेत आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेमागची इनसाईड स्टोरी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत सकाळच्या वरिष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी काही मुद्दे मांडले.

पक्ष फोडीचे राजकारण -

शेतकऱ्यांचा असंतोष, पक्ष फोडीचे राजकारण यामुळे महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला. पण महायुतीला एवढ्या कमी जागा मिळतील, असं वाटत नव्हतं. भाजप २३ वरुन ९ जागांवर घसरेल असं कुणालाही वाटलं नसेल. त्यामुळे अपेक्षित यश मिळालं नाही. पण झालेल्या पराभवाचं शैल्य भाजपला वाटतं.

पराभवाची जबाबदारी स्विकारत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सरकारमधून बाहेर पडायचे आहे. पक्ष आणि संघटनेसाठी काम करायचे अशी विनंती फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे. यापूर्वी शिंदे सरकार आलं होतं तेव्हा देखील त्यांनी मी सरकारला बाहेरुन मदत करेन, असे म्हटले होते. पण त्यावेळी केंद्रीय नेतृत्वाने जाहीर आदेश देत उपमुख्यमंत्री पद स्विकारायला लावलं होतं.

मोठं प्रयत्न करुन देखील मोठं अपयश-

महाराष्ट्रात मोठे प्रयत्न करुन देखील मोठ अपयश पदरी आलं आहे. हा ठपका, डाग पूसून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना ही शिक्षा असेल तर जनता याला कसा प्रतिसाद देईल हा नंतरचा प्रश्न आहे. पण त्यांना प्रयत्नात कुठं कसुर ठेवायची नाही आहे. तसेच महाराष्ट्रात जे सरकार आहे. ते सरकार काही निर्णय घेऊ शकलं नाही तर त्या निर्णयाचा त्यांना भाग राहायचं नाही. हे फडणवीसांच एका अर्थाने चातुर्य आहे.

मराठा समाजाची सतत टीका-

पदावरुन खाली उतरण्याची इच्छा मान्य झाली तर ते महाराष्ट्रात दौरा करतील. देवेंद्र फडणवीस यांना आपण लोकनेते आहोत, हे दाखवण्याची सध्या इच्छा दिसत आहे. दुसरं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करुन देखील मराठा समाज त्यांना सतत लक्ष करत आहेत, असे फडणवीसांचे समर्थक म्हणतात. मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करुन देखील निराशा येत असेल, टीकेचं लक्ष व्हाव लागत असेल तर त्यापेक्षा मी सरकारचा भाग राहत नाही मी पक्षाचे काम करतो, असं काहीसं गणित फडणवीसांच्या भूमिकेमागे दिसत आहे.

फडणवीस त्यांचा समर्थक वर्ग दाखवू शकतात -

गेल्या दोन-तीन महिन्यापासून महायुतीला यश मिळावं यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत होते. पदावर गेल्यामुळे जनसंपर्क कमी होतो. असंही कदाचित त्यांना वाटत असेल.  आता केंद्र त्यांच्या राजीनाम्याबाबत काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे चित्र स्पष्ट होईल. दुसरं म्हणजे फडणवीस त्यांचा समर्थक वर्ग किती दाखवू शकतात याला देखील महत्व आलं आहे.

Devendra Fadnavis Resignation
Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम? दिल्लीला रवाना, मोदी-शहांची घेणार भेट!

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज्यात एनडीएला जो धक्का बसला आहे त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. या पराभवाची जबाबदारी मी घेतो. ते पुढे म्हणाले की, सरकारच्या जबाबदारीतून मला मुक्त करण्याची विनंती मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना करणार आहे."

पक्ष संघटनेची जबाबदारी द्यावी - फडणवीस

"माझ्याकडे पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात यावी. आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मी सरकारसोबत राहून मार्गदर्शन करत राहीन. ते पुढे म्हणाले, सरकारमध्ये न राहता राज्यात पक्षाच्या बळासाठी काम करायचे आहे."

भाजप प्रदेशाध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळला-

देवेंद्र फडणवीस यांच्या पदावरून पायउतार होण्याच्या इच्छेवर महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राहावेत, अशी आमची इच्छा आहे. सरकारमध्ये राहून त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम करावे. त्यांनी सरकारला तीन दिवस आणि संघटनेला चार दिवस द्यावेत, अशी आमची इच्छा आहे."

महाराष्ट्रातील निवडणुकीचे निकाल कसे लागले?

देशात झालेल्या 18व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून 2024 रोजी आले. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. या 48 जागांपैकी भाजपला केवळ 9 जागा जिंकता आल्या. तर महाराष्ट्रात एनडीएला 17  जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीला 23 जागा मिळाल्या. भाजपला फक्त 11 जागा मिळाल्या. तर काँग्रेसला 13 जागा मिळाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com