Devendra Fadnavis : 'शंभर देश मोदींमुळे जिवंत आहेत', देवेंद्र फडणवीसांचा दावा; म्हणाले...

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis esakal

अकोलाः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोल्यातून जोरदार भाषण ठोकलं. उद्धव ठाकरे यांच्यावर आसूड ओढत पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवर किती मोठे नेते झालेले आहेत, याबद्दलचं विवेचन केलं.

देवेंद्र फडणवीस बोलतांना म्हणाले की, मी म्हणालो होतो मैं समंदर हूं लौटकर जरुर आऊंगा. परत तर आलोच शिंदेजींना देखील परत घेऊन आलेलो आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना सांगितलं होतं, ज्या दिवशी काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल तेव्हा मी माझं दुकान बंद करील. परंतु आम्ही उद्धवजींचं दुकान बंद केलं आणि बाळासाहेबांचा पक्ष जिवंत ठेवला.

Devendra Fadnavis
Maharashtra Politics : इच्छा आहे तोपर्यंतच 'मविआ'मध्ये राहू म्हणणाऱ्या राऊतांना अजित पवारांचं उत्तर; म्हणाले...

फडणवीस पुढे म्हणाले की, काशी विश्वनाथाचं मंदिर ज्या औरंगजेबने भंग केलं होतं ते पुन्हा बांधण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदीजी असे नेते आहेत ज्यांनी देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला आहे. दिल्लीहून निघालेला एक रुपया तर तो थेट शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो, त्याचं कारण नरेंद्र मोदी आहेत.

उद्धव ठाकरेंवर बोलतांना फडणवीस म्हणाले की, देशभरातील विरोधक पाटण्याला एकत्र येणार आहेत, हातात हात घेणार आहेत आणि 'मोदी हटाओ'च्या घोषणा देणार आहेत. आता त्यांच्यात एक नेता वाढला आहे. तो म्हणजे उद्धव ठाकरे. मात्र कितीही वेली एकत्र आल्या तरी त्या वटवृक्ष होऊ शकत नाही. वटवृक्ष एकच असतो त्याचं कुणीही वाकडं करु शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Motivational Story : एक हजार गावांना स्वच्छतेचा मंत्र देणारा अवलिया! ; संत गाडगेबाबांच्या शिकवणीचा अंगीकार

शंभर देशांचे प्रमुख म्हणतायत मोदींमुळे आम्ही जिवंत आहोत- फडणवीस

''जगामध्ये ५ देश कोविडची लस बनवू शकले, त्यामध्ये भारत हा एक देश आहे. मोदीजींनी लस दिल्यामुळे आज आपण जिवंत आहोत. मोदींजींनी १०० देशांना लस दिली. मी मॉरिशसला गेलो होतो. मला त्यांचे राष्ट्रपती म्हणाले, मोदींमुळे आमचा देश जिवंत आहे. त्यांनी जर आम्हांला लस दिली नसती तर आमच्या देशात कुणी जिवंत वाचलं नसतं. शंभर देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती सांगतात, मोदींमुळे आमचे देश जिवंत आहेत'', असं विधान फडणवीस यांनी केलं आहे.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, जी २० मध्ये मोदीजी जातात त्या ठिकाणी जगातल्या बलाढ्य देशाचे राष्ट्रपती म्हणतात मोदीजींची सही मला हवीय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मोदींना बॉस म्हणतात. १२० देशाचे प्रमुख म्हणतात जगात आमचा आवाज तुम्ही आहात. सगळ्या आखाती देशांनी एकत्रित येऊन त्यांच्या सर्वोच्च सन्मान त्यांनी मोदीजींना दिला. हा खऱ्या अर्थाने भारताचा सन्मान आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com