esakal | 'संजय राऊत सर्वज्ञ नाहीत; सहकार मंत्रालयावरील टीका चुकीची'
sakal

बोलून बातमी शोधा

संजय राऊत

'संजय राऊत सर्वज्ञ नाहीत; सहकार मंत्रालयावरील टीका चुकीची'

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पुणे - संजय राऊत यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, असे तुम्हाला का वाटते.? तेच पंडित आहेत, त्यांनाच संविधान समजते, असे तुम्हाला वाटत असेल तर तसे नाहीये, ते सर्वज्ञ नाहीत,’ अशा शब्दात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार राऊत यांना टोला हाणला.

सहकार हा राज्य सरकारच्या अंतर्गत विषय आहे. केंद्र सरकार त्यावर अतिक्रमण करीत आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावर फडणवीस यांनी हा टोला हाणला. ते म्हणाले,‘‘आतापर्यंत एनसीडीसीच्या माध्यमातून केंद्र सरकारने राज्य सरकारला हजारो कोटी रुपये दिले. ते दूध संघ, साखर कारखाने, सूत गिरण्यांना मिळाले. साखर कारखान्यांची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या सत्तर वर्षात केंद्र सरकार सहकार चळवळ मारते, असा आरोप होत आहे. आता केंद्र सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केले, तर सहकारावर अतिक्रमण केली जात आहे, अशी ओरड केली जात आहे. उलट या निर्णयामुळे देशभरातील सहकार क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. त्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला होईल असे मला वाटते. ’’

हेही वाचा: ...तरच विधानसभा अध्यक्षपद स्वीकारणार - भास्कर जाधव

सहकार मंत्रालयावर अमित शहा यांच्या नियुक्तीबद्दल ते म्हणाले,‘‘शहा हे मूळचे सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत. त्यानंतर ते राजकारणात आले. सहकार क्षेत्रातील जाण त्यांना असल्यामुळे त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली असावी, असे वाटते. परंतु शहा यांची नियुक्ती झाल्यानंतर काही लोकांना थरथरायला होते. ते का होते, हे मला माहिती नाही.’’

जबाबदारी झटकू नये

फडणवीस म्हणाले,‘‘ स्वप्नील लोणकर यांची आत्महत्या चटका लावणारी आहे. सरकार याबाबत गंभीर आहे, असे वाटत नाही. राज्य सरकारने जबाबदारी झटकू नये. उलट सरकारने गांभीर्याने पावले उचलण्याची आवश्‍यकता आहे.

loading image