संजय राऊतांना विचारतो कोण? त्यांचे वक्तव्य शिवराळ; देवेंद्र फडणवीसांचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis and Sanjay Raut

संजय राऊतांना विचारतो कोण? त्यांचे वक्तव्य शिवराळ; फडणवीसांचा हल्ला

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (Narendra Modi) उद्याच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांनी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणाचा निर्धार रद्द केल्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्यांनी पळ काढल्याची खोचक टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. संजय राऊत यांना विचारतो कोण? त्यांचा वजूद काय? संजय राऊत यांना ना शिवसेनेत किंमत आहे ना बाहेर, असे उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याचा अतिशहाणपणा कुणी करू नका, मातोश्रीच्या वाटेला जाऊ नका नाहीतर २० फूट खाली गाडले जाल असे राऊत म्हणाले होते. शिवसेनेच्या अंगावर याल तर येताना स्मशानात गोवऱ्या रचून या, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे. राणा दाम्पत्याच्या पाठीशी भाजप असल्याचाही आरोप राऊत यांनी (Sanjay Raut) केला होता.

हेही वाचा: खाद्यतेल आणखी महाग होणार; इंडोनेशियाचा निर्णय भारतासाठी ठरणार घातक

यावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, राणा दाम्पत्य हनुमान चालिसा म्हणताहेत त्यावर एवढा राडा कशाला. कुणी हनुमान चालिसा म्हणतो म्हणून इतकी माणसे जमा करायची, हे बरोबर नाही. रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा गेले असते एखाद्या कोपऱ्यात आणि हनुमान चालिसाचे पठण केला असता. कुणी दखलही घेतली नसती. ते हल्ला करायला जाणार नव्हते. कुणाच्याही घरावर आंदोलन करण्यास आमचाही विरोध आहे. कुणाच्या घरावर जाणे व हल्ला करणे हे योग्य नाही. असं केल्याने सहानुभूती मिळेल असे शिवसेनेच्या नेत्यांना वाटत आहे. मात्र, त्यांना सहानुभूती मिळणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गृहमंत्रालयाचे बारा वाजले आहे

पोलिसांना हाताशी धरून हे सगळं चाललं आहे. पोलिसांच्या भरवशावर सत्तेचा माज सुरू आहे. गृहमंत्र्यांना चांगलं माहीत आहे की राष्ट्रपती शासन कधी लागते. सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. जनतेला सर्व माहीत आहे. वळसे पाटील यांना कमीपणा वाटला पाहिजे की ते गृहमंत्री असताना गृहमंत्रालयाचे बारा वाजले आहे, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

हेही वाचा: पत्नीने सुपारी देऊन केली पतीची हत्या; प्रियकर, मित्राच्या मदतीने केला घात

संजय राऊत यांचे वक्तव्य शिवराळ

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विचारतो कोण? त्यांचा वजूद काय? राऊत उद्या अमेरिकेच्या पंतप्रधानांना घाबरत नाही असं म्हणतील. परंतु, अमेरिकेचे राष्ट्रपती त्यांना हुंगतो का? हे पाहणेही गरजेचे आहे. संजय राऊत यांना ना शिवसेनेत किंमत आहे ना बाहेर आहे. संजय राऊत यांचे वक्तव्य शिवराळ आहे. त्यांचे वक्तव्य घरी कुटुंबासोबत कुणी बघू शकत नाही, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

Web Title: Devendra Fadnavis Sanjay Raut Ravi Rana Navneet Rana Hanuman Chalisa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top