पत्नीने सुपारी देऊन केली पतीची हत्या; प्रियकर, मित्राच्या मदतीने केला घात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wife kills husband

पत्नीने सुपारी देऊन केली पतीची हत्या; प्रियकर, मित्राच्या मदतीने केला घात

पोलिसांनी तरुणाचा मृतदेह महिनाभरानंतर कबरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी (Autopsy report) पाठवला. यावेळी तरुणाचा नैसर्गिक मृत्यू न झाल्याचे निष्पन्न झाले. त्याचा खून (Murder) झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. तरुणाच्या पत्नीने मित्र आणि प्रियकरासह मिळून २० हजारांची सुपारी देऊन हत्या केल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये घडली. (Wife kills husband)

बागपतच्या निवाडा गावात राहणाऱ्या शहजादचा ३ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. पत्नीने पतीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगितले होते. मात्र, घटनेच्या दहा दिवसांनंतर मृताच्या नातेवाइकांनी खुनाचा आरोप करीत पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी महिनाभरानंतर मृतदेह कबरीतून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला होता.

हेही वाचा: राठोड यांचा काँग्रेसवर हल्ला; महिलांच्या सन्मानासाठी ओळखले जाणारे राज्य...

शवविच्छेदन अहवाल (Autopsy report) मृताच्या अंगावर जखमेच्या खुणा आढळून आल्या. यानंतर पोलिसांनी मृताच्या पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी तिने प्रियकर आणि मित्राच्या मदतीने पतीचा खून (Murder) केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून कारागृहात रवानगी (accused arrested) केली.

एसपी बागपत निरज कुमार जदौन यांनी घटनेचा खुलासा करताना सांगितले की, तरुणाचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृतदेहावर जखमांच्या खुणा असल्याचे आढळून आले. त्यानंतर मृताच्या पत्नीची कसून चौकशी केली. यावेळी सुपारी देऊन पतीची हत्या केल्याचे पत्नीने सांगितले.

Web Title: Wife Kills Husband Three Accused Arrested Crime News Uttar Pradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top