Video : फडणवीसांनी भर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना दिली चिठ्ठी, चर्चेला उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra fadnavis secretly  pass note to cm  eknath shinde during press conference sparks discussion

फडणवीसांनी भर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना दिली चिठ्ठी, चर्चेला उधाण

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत पेट्रोल 5 आणि डिजेल 3 रुपयांनी स्वस्त करण्याच्या घोषणेसह इतरही अनेक घोषणा केल्या.दरम्यान या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना एक चिठ्ठी सरकावली त्यावरुन आता चर्चांना उधाण आलं आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत असताना शेजारी बसलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिशाला लावलेला पेन काढला आणि काहीतरी एका चिठ्ठीवर लिहिलं आणि हळूच ही चिठ्ठी मुख्यमंत्र्यांच्यासमोर केली, त्यामुळे त्या चिठ्ठीत नेमकं होतं काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे. व्हिडीओमध्ये चिठ्ठी दिल्याचा प्रसंग ८ मिनीटं ३५ सेकंदांनंतर पाहू शकता.

हेही वाचा: केसरकरांचं अजित पवारांना प्रत्युत्तर; म्हणाले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ४० मंत्र्यांचं...

अजित पवार यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक शब्दात टीका केलीय पत्रकार परिषद सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरील माईक स्वत:कडे खेचणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलताना पवार म्हणाले की, अडीच वर्षात आम्ही कधी माईक कधी खेचला नाही. मी कधीच उद्धवजींसमोरचा माईक खेचून स्वत:कडे घेतला नाही. ही तर सुरुवात आहे. आत्तापासून ओढाओढी असेल तर महाराष्ट्राने हे पाहावं, असे ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: ललित मोदींची सुश्मितासोबत डेटिंग, लग्नासाठी मात्र अजुनही वेटिंग

Web Title: Devendra Fadnavis Secretly Pass Note To Cm Eknath Shinde During Press Conference Sparks Discussion

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..