साहेब पिक्चरमध्ये येत नाहीत, तर ते...; फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis - Sharad Pawar

साहेब पिक्चरमध्ये येत नाहीत, तर ते...; फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब

विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून, हे अधिवेश वादळी ठरताना दिसतंय. विरोधीपक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थित केलेल्या एका नव्या मुद्यानं राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. भाजपनेते गिरीष महाजन यांना अडकवण्यासाठी करण्यात आलेल्या षडयंत्रामागे सरकारी वकील आणि पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. तसंच बडे साहेब या प्रकरणात स्वत: लक्ष घालत असल्याचं म्हणत फडणवीस म्हणाले.

हेही वाचा: "वक्फ बोर्डावर दाऊदची माणसं"; फडणवीसांनी पुन्हा दिला पेनड्राईव्ह

"साहेब कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत. ते कुणाला तरी घरी बोलावून सांगतात. थेट फोन केला तर उगाच स्टेशन डायरीत नोंद नको. पण, शरद पवारांना गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना एक लाख टक्के संपवायचंय. गिरीश महाजन आणि फडणवीस यांना अडकवणारच." असं सरकारी वकील प्रविण चव्हाण म्हणत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

हेही वाचा: फडणवीसांच्या आरोपांनंतर सरकारी वकील प्रविण चव्हाणांची पहिली प्रतिक्रीया

दरम्यान, अजित पवार यामध्ये सपोर्ट करत नाहीत, मात्र मोठे साहेब सगळं पाहाताय असं या व्हिडिओमध्ये प्रविण चव्हाण म्हणत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. "अजित पवार सपोर्ट करीत नाही. पर बडे साब सब देख रहे है. कोणी चांगले अधिकारी आहेत का? चार/पाच अधिकार्‍यांची चांगली नावे असेल तर द्या, असे त्यांनी मला सांगितले." असं त्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतंय. त्यानंतर हे बडे साहेब म्हणजेच पवार साहेब असल्याचं देखील गिरीष महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

Web Title: Devendra Fadnavis Serious Allegations On Sharad Pawar In Girish Mahajan Conspiracy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Devendra Fadnavis
go to top