फडणवीसांच्या आरोपांनंतर सरकारी वकील प्रविण चव्हाणांची पहिली प्रतिक्रीया

राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
Pravin Chavhan
Pravin Chavhan Team eSakal

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज काही मोठे गौप्यस्फोट करत विशेष सरकारी वकिल प्रविण चव्हाण (Pravin Chavhan) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गिरीष महाजन (Girish Mahajan) यांना अडकवण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कट रचण्यात आल्याचं देखील ते म्हणाले. तसंच या प्रकरणातील काही व्हिडिओ देखील त्यांनी समोर आणले आहेत. त्यानंतर आता प्रविण चव्हाण (Pravin Chavhan) यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

Pravin Chavhan
साहेब पिक्चरमध्ये येत नाहीत, तर ते...; फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब

प्रविण चव्हाण म्हणाले सरकार माझं नाही, कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, माझ्या कुटुंबातील कुणीही कोणत्या पक्षात नाही, माझ्या संपूर्ण कारकिर्दीत कोणत्याही निवडणुकीशी संबध नाही. त्यामुळे मुळात असं काही झालं आहे का? असा प्रश्न आहे. या व्हिडिओमध्ये कुणाचे आवाज आहेत, हे बाहेर येईलच. आपण कोणतेही व्हिडिओ पाहिले नाहीत, त्यातले आवाज ऐकलेले नाहीत. फॉरेन्सिक डिपार्टमेंट हे सगळे पुरावे तपासेल, महाराष्ट्राबाहेर सुद्धा लॅब आहेत, तिथे सुद्धा ते स्पष्ट होईल.

Pravin Chavhan
यंत्रणांचा गैरवापर तुम्ही केला, यांनीही केला असेल; फडणवीसांवर गोटेंचा निशाणा

दरम्यान, ते म्हणाले की, मी अनेक महत्वपुर्ण केसेसमध्ये आहे. तेव्हा आरोपीला वाटतं की, या वकिलाला बाजूला केलं तर बेल मिळेल. घरकुल घोटाळ्यातील सुरेश जैनला बेल मिळाली नाही, संतोष आंबेकर या नागपुरच्या केसमधील आरोपीला देखील जामीन मिळालेला नाही. त्यामुळे ही देखील शंका या प्रकरणात येत असल्याचं चव्हाण म्हणाले. जेवढ्या केसेस माझ्याकडे आहेत, त्यातील आरोपी जेलमध्ये आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com