esakal | चंद्रकांत पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

पुढील मुख्यमंत्री तुम्हीच होणार का, हा प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी पुन्हा "तुम्हाला काही शंका आहे का?', असा प्रतिप्रश्‍न केला. यावेळी चांगला हशा पिकला. 

चंद्रकांत पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : चंद्रकांत दादांना तुम्ही का कटघऱ्यात उभे करता, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना केला. "पक्षाने आदेश दिल्यास मी संधी थोडी सोडणार आहे', अशा आशयाचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अलीकडेच केले होते.

त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांनाच हा प्रतिप्रश्‍न केला. नागपूर जिल्यातील महाजनादेश यात्रा आटोपून भंडारा जिल्याकडे प्रयाण करण्यापूर्वी आयोजित पत्रकार परीषदेत फडणवीस बोलत होते. चंद्रकांतदादा माझे खुप चांगले सहकारी आहेत. त्यांच्या कामाचा धडाका प्रचंड आहे. नवीननवीनच ते प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. त्यांना त्यांचे काम करु द्या. असेही ते म्हणाले.

पुढील मुख्यमंत्री तुम्हीच होणार का, हा प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी पुन्हा "तुम्हाला काही शंका आहे का?', असा प्रतिप्रश्‍न केला. यावेळी चांगला हशा पिकला. 

निवडून आलेले सर्व आमदार आणि पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, त्यानुसार मुख्यमंत्र्यांची निवड होत असते. त्यामुळे तो निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. लवकरच मित्रपक्षांच्या जागा ठरविल्या जातील. सीटींग आमदार असलेल्या जागा त्या-त्या पक्षांकडेच राहतील. एखाद दुसऱ्या सीटींग जागेवर उमेदवार बदलायचा झाल्यास पक्षपातळीवर त्यावर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

loading image