Sharad Pawar: "पवारांनी आमचा वापर केला, रणनीती आखली अन्… शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी माघार घेतली"

पहाटेच्या शपथविधीआधी घडलेल्या घडामोडीबाबत देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा खुलासा
Sharad Pawar
Sharad PawarEsakal

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी घेतला होता. भल्या पहाटे हा शपथविधी घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या शपथविधीबाबत अनेकांच्या मनात अद्याप मोठा संभ्रम आहे. तर अनेक मुलाखती, चर्चासत्रे यावेळी अनेक वेळा हा विषय समोर येतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा खुलासा केला आहे. या शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी नेमकं काय घडलं? याचा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.(Latest Marathi News)

पहाटेच्या शपथविधीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुळखतीवेळी भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "शरद पवार यांची मिस्ट्री समजून घ्यायची असेल तर आधी त्यांची हिट्री समजून घ्यायला हवी. तरच ही मिस्ट्री समजेल. पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी जेव्हा युती तोडून मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी आमचा फोनही घेणं बंद केलं होतं", 'रिपब्लिक टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.(Latest Marathi News)

"ते आमच्याबरोबर येणार नाहीत, हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्याकडे काय पर्याय आहेत? याचा विचार केला. तेव्हा राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं की, एनसीपी भाजपाबरोबर येऊ शकते. ते स्थिर सरकार देऊ शकतात."(Latest Marathi News)

Sharad Pawar
Indian Railway: रेल्वे कर्मचाऱ्यांवर ताण! 2.74 लाख पदे रिक्त, कधी होणार या पदांवर भरती?

पुढे फडणवीस म्हणाले की, “यानंतर आमची शरद पवारांबरोबर बैठक पार पडली. त्या बैठकीत ठरलं की, महाराष्ट्रात भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन केलं जाईल. सरकार कसं असेल, याचा आराखडा तयार झाला. त्यानंतर मी आणि अजित पवार आम्ही दोघं सरकारचं नेतृत्व करणार, हेही ठरलं होतं. सर्व अधिकार आम्हाला दिले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी त्यातून माघार घेतली,” असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.(Latest Marathi News)

“आमचा शपथविधी होण्याच्या तीन ते चार दिवस आधी शरद पवारांनी माघार घेतली. पण अजित पवारांकडे भाजपाबरोबर येण्याशिवाय कोणताही पर्याय उरलाच नाही. आम्ही संपूर्ण तयारी केली होती. त्यानंतर अजित पवार आणि मी शपथ घेतली. कारण आपण शरद पवारांबरोबर इतक्या बैठका घेतल्या आहेत, त्यामुळे बाकीचे आमदार आणि शरद पवार आपल्याबरोबर येतील, असा विश्वास अजित पवारांना होता", असंही ते पुढे म्हणालेत.(Latest Marathi News)

Sharad Pawar
Ashadhi Ekadashi 2023 : वारी चुकली? हरकत नाही, मुंबईतील पंढरीत घ्या विठ्ठलाचे दर्शन; इथे आहे मुंबईची पंढरी

तर 'शेवटी शरद पवार आमच्याबरोबर आले नाहीत. त्यामुळे आमचं सरकार पडलं. पण मी एवढंच सांगेन की, त्यावेळी जे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. याची सुरुवात शरद पवारांशी बोलूनच करण्यात आली होती', असंही ते पुढे म्हणालेत.(Latest Marathi News)

तर उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी जे केलं ते पाठीत खंजीर खुपसणं होतं. पवारांनी आमच्याबरोबर निवडणूक लढवली नव्हती. आमचा वापर केला. रणनीती आखली आणि आमची दिशाभूल केली आणि निघून गेले. त्यांनी आमच्याबरोबर डबल गेम केला. पण पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. (Latest Marathi News)

Sharad Pawar
Tripura Rath Accident: जगन्नाथ रथ यात्रेत मोठी दुर्घटना; वीजेच्या धक्क्याने 6 जणांचा मृत्यू, 10 पेक्षा अधिक जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com