
Devendra Fadnavis : "त्यांना कुणीतरी खोटं सांगून भांग पाजली अन्..." ; देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
आज धुलिवंदन आहे, देशभर हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. मनातील द्वेष विसरून एकमेकांना रंग लावण्याचा हा दिवस आहे. राजकीय धुलिवंदन देखील आज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील धुलिवंदनाचा आनंद घेतला.
आज धुळवडीच्या दिवशी विरोधकांना माफ केलं असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मित्रांना कुणीतरी भांग पाजली होती, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ते मित्र कोण होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी विधानसभेत सांगितले होते की खूप लोकांनी आम्हाला त्रास दिला त्या सर्वांचा आम्ही बदला घेणार आणि आमचा बदला हा आहे की आम्ही या सर्वांना माफ केले. मागच्या काळात काही आमचे मित्र आहेत त्यांना कुणीतरी खोटं सांगून भांग पाजली. त्यानंतर दिवसभर ते गाणे म्हणत होते कुणी रडत होत. हे सर्व पाहून मजा आली पण मी हे सांगण्याचा प्रयत्न केला की असा नशा केल्यापेक्षा भक्तिचा नशा करावा, कामाचा नशा करावा"
ठाणे शहरातील किसन नगर विभागातील शिवसेना शाखेत एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून जुने मित्र, सहकारी आणि शिवसैनिकांच्या साथीने रंगपंचमीचा सण आनंदात साजरा केला. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर साजरी होणारी ही त्यांची पहिलीच रंगपंचमी आहे.