
मोदी सरकार हे सामान्यांचे सरकार, इंधन दर कपातीनंतर फडणवीसांचे ट्वीट
केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलास देत पेट्रोल-डिझेलवरील (Petrol-Diesel) उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, यानंतर पेट्रोल 9.5 प्रतिलिटर आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे, दरम्यान भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे आभार माणले आहेत.
फडणवीस ट्वीट करत म्हणाले की, पेट्रोल 9.5 रूपये प्रतिलिटर, डिझेल 7 रुपये प्रतिलिटर ने स्वस्त होणार! पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रतिलिटर केंद्रीय कर कमी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांचे अनेकानेक आभार!
सरकारच्या या निर्णयाबद्दल बोलताना फडणवीस यांनी लिहीले की, यासाठी केंद्र सरकार प्रतिवर्ष 1 लाख कोटी रुपये इतका भार सहन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 200 रुपये सबसिडी देण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे आणि यासाठी 6100 कोटी रुपये आर्थिक भार येणार आहे, असे फडणवीस म्हणाले आहे.
हेही वाचा: ग्राहकांना दिलासा! पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारचे कौतुक करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रातील मोदी सरकार हे या देशातील सामान्य माणसाचे सरकार आहे, हेच पुन्हा एकदापंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सिद्ध केले आहे असे सांगत, गरिब कल्याण हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि त्यासाठी ते सतत झटत असतात, असे म्हटले आहे, या निर्णयांमधून त्यांनी हेच प्रत्यंतर पुन्हा एकदा दिले आहे.
आता माझी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की, त्यांनी पुढाकार घेत पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करावी आणि सामान्यांना आणखी दिलासा द्यावा. कारण, महाराष्ट्रातील दर हे सर्वाधिक आहेत. सत्तेतील पक्षांनी रस्त्यावर बसायचे नसते, तर जनतेला दिलासा द्यायचा असतो, असा टोला त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.
हेही वाचा: पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केल्याने सरकारी तिजोरीवर येणार इतका 'लोड'!
Web Title: Devendra Fadnavis Thanked Pm Modi Nirmala Sitharaman After Reduction In Petrol And Diesel Rates
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..