
Devendra Fadnavis to Relocate to Varsha Bungalow Post Daughter's Exams : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यंमत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अद्यापही ते मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत. त्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.
खासदार संजय राऊत यांनीही यासंदर्भात बोलताना, ‘वर्षा’ बंगल्यावर जादूटोणा केल्या असल्याने देवेंद्र फडणवीस तिथे राहायला जात नाहीत, असा दावा केला आहे. याची जोरदार चर्चा सुरु असतानाचा आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.