Devendra Fadnavis : शिमग्यावर प्रतिक्रिया देत नसतात; फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Devendra Fadnavis : शिमग्यावर प्रतिक्रिया देत नसतात; फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बुधवारी मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. अनेक राजकीय मुद्द्यांवरून एकमेकांवर टोलेबाजीही करण्यात आली. दोन्ही नेत्यांनी केलेल्या भाषणांवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर मीडियाशी बोलताना खोचक शब्दांत टीका केली आहे. शिमग्यावर प्रतिक्रिया देत नसतात अशा शब्दात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.(Devendra Fadnavis Uddhav Thackeray Speech Shivsena Dasara Melava 2022)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

ज्या प्रमाणात लोक बीकेसीच्या मैदानावर पाहायला मिळाले ते पाहाता काल एकनाथ शिंदेंनी हे दाखवून दिलं की खरी शिवसेना कोणती. त्या मैदानाची क्षमता शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट आहे. पण तरीही तिथे तुडुंब गर्दी होती. महाराष्ट्रभरातून लोक आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, हे कालच्या मेळाव्यात प्रस्थापित केलं आहे. यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो.

तसेच, “शिमग्यावर कधीही प्रतिक्रिया देत नसतात”, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रत्येक मुद्द्यावर हे एकच उत्तर असल्याचे त्यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे भाजपाची स्क्रिप्ट घेऊन बोलतात, असा आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. असं जे म्हणत आहेत, त्यांनी आपला स्क्रिप्टरायटर बदलायला हवा. तेच ते, तेच ते.. किती वेळा तीच स्क्रिप्ट. एकतर तुमच्या स्क्रिप्टरायटरला क्रिएटिव्हिटी दाखवायला सांगा, नाहीतर नवीन स्क्रिप्टरायटर आणा. आम्हालाही हे ऐकून कंटाळा आला आहे, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

शिवसेनेच्या सगळ्या फुटीच कारण राष्ट्रवादी आहे. मुळ शिवसेना विचार बाजूला टाकून उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विचार स्विकारला. तसं आचरण स्विकारलं. आणि ज्यांचे मुंबईच्या बॉम्बस्फोटाशी संबंध आहेत. त्या लोकांसोबत बसण मान्य केलं. जे सावरकरांना रोज शिव्या देतात. अशा लोकांसोबत बसणं मान्य केलं. म्हणूनच तर त्यांच्यावर ही वेळ आली.

यासोबतच, एकनाथ शिंदेंनी विकासाच्या मुद्द्यांना हात घातला असं म्हणत फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या आधीच्या भाषणांची तुलना केली आहे. “आम्ही काय करतोय, काय करणार आहे हे एकनाथ शिंदेंनी भाषणात सांगितलं. मागच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे होत नव्हतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते पक्षप्रमुखाचंच भाषण करायचे. त्यांनी एकही भाषण मुख्यमंत्र्याचं केलं नाही”, असही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com