esakal | पूरग्रस्तांसोबत फडणवीस जेवले, जाणून घेतल्या व्यथा
sakal

बोलून बातमी शोधा

पूरग्रस्तांसोबत फडणवीस जेवले, जाणून घेतल्या व्यथा

पूरग्रस्तांसोबत फडणवीस जेवले, जाणून घेतल्या व्यथा

sakal_logo
By
नामदेव कुंभार

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. कोकण आणि प. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणाऱ्या फडणवीस यांनी पूरग्रस्त आणि दरडग्रस्तांच्या व्यथा जाणून घेत मदतीचा विश्वासही व्यक्त केला. बुधवारी सायंकाळी फडणवीस यांनी पूरग्रस्तांसोबत भोजन घेत सर्वांच्या व्यथा जाणून घेतल्या.

देवेंद्र फडणवीस यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्याचा प्रारंभ साताऱ्यातून झाला. मोरगिरी/आंबेघर, शिद्रुकवाडी, कोयनानगर तसेच हुंबरळी याठिकाणी त्यांनी भेटी देत स्थितीची पाहणी केली. यावेळी तेथील उपस्थिती पूरग्रस्तांसोबत संवाद साधला. फडणवीस यांच्यासोबत प्रवीण दरेकर, अतुल भोसले, जयकुमार गोरे, नरेंद्र पाटील हे उपस्थित होते.

हेही वाचा: 14 जिल्यातील निर्बंध कमी होणार? मुख्यमंत्री आज घेणार निर्णय

कराड येथून रवाना होण्यापूर्वी कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र भाजयुमोच्या वतीने मदतसामुग्री असलेल्या वाहनांना देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा झेंडा दाखवून रवाना केले. या मदतसामुग्रीत तयार अन्न, धान्यसामुग्री, पाणी, कपडे इत्यादींचा समावेश आहे. मोरगिरी/आंबेघर येथे पाऊस आणि पूर यामुळे संसार उघड्यावर पडलेले आहेत. तात्पुरत्या निवासी शिबिरांमध्ये त्यांना सद्या ठेवण्यात आले आहे. मोरणा विद्यालय मोरगिरी येथे या पूरग्रस्तांना भेटून, त्यांच्यासोबत भोजन करत त्यांच्या व्यथा देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या. आंबेघर येथे दरड कोसळण्याच्या घटनेत सुमारे १५ लोकांचे प्राण गेले. त्यांच्या कुटुंबियांचे फडणवीस यांनी सांत्वन केले आणि त्यांना मदतसामुग्रीचे वाटप सुद्धा केले.

हेही वाचा: 14 जिल्यातील निर्बंध कमी होणार? मुख्यमंत्री आज घेणार निर्णय

loading image
go to top