esakal | 14 जिल्यातील निर्बंध कमी होणार? मुख्यमंत्री आज घेणार निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

14 जिल्यातील निर्बंध कमी होणार? मुख्यमंत्री आज घेणार निर्णय

14 जिल्यातील निर्बंध कमी होणार? मुख्यमंत्री आज घेणार निर्णय

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Maharashtra Lockdown Latest News मागील काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे. तसेच कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. परिणाणी उपचाराधीन रुग्णसंख्यामध्ये कमालीची घट पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोन ऑगस्टपासून राज्यात कोरोना निर्बंध शिथिल करण्यात येऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट सर्वात कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार असल्याचेही म्हटलेय. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्कफोर्स यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर राज्यातील कोरोना निर्बंधाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. नव्या निर्बंधानुसार, राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये विकेंड लॉकडाउन संपू शकतो. त्याशिवाय दुकानांच्या वेळाही वाढवण्यात येऊ शकतात.

दिल्ली आणि कर्नाटकासह इतर काही राज्यांनी कोरोना निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही विचार केला जाऊ शकतो. राज्यातील रुग्णसंख्या आणि संसर्गदर कमी झाल्याने निर्बंध शिथिल केले जावेत, अशी मागणी बहुतेक मंत्र्यांनी केली. यानुसार येत्या काही दिवसांत सध्या लागू असलेले र्निबध काही प्रमाणात शिथिल केले जातील.

हेही वाचा: 'मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं, राणे पांढऱ्या पायाचे'

सिरो सर्व्हेनुसार महाराष्ट्रातील परिस्थिती सुधारण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे. त्यामुळे काही भागातील संसर्ग अत्यंत कमी झाला आहे. तेथे संसर्ग कमी झाला असल्याने निर्बंध हटवायला हरकत नाही असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र मुख्यमंत्री त्यावर अंतिम निर्णय घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: ठाकरे सरकारची बदनामी; एसटी कर्मचारी निलंबित

दररोज वाढणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसागणिक घट होत आहे. मृत्यूदरांमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. जूनमधील 2.38 टक्क्यांवरून जुलैमध्ये 1.24 टक्के इतका कमी झाला आहे. तसेच राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही 82 हजारांवर आली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या 72 टक्केंनी घटली आहे. पुणे, ठाणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पाच जिल्ह्यातील उपचाराधीन रुग्ण 49 हजार इतके आहेत. तर मुंबई, अहमदनगर, सोलापूर, बीड, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांत 20 हजार 386 रुग्ण आहेत. अशारितीने वरील दहा जिल्ह्यांत राज्यातील 82 हजार उपचाराधीन रुग्णांपैकी 69 हजार रुग्ण आहेत. म्हणजेच राज्यातील सक्रीय रुग्णांपैकी 84 टक्के रुग्ण या दहा जिल्ह्यातील आहेत. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा: कोरोना निर्बंध 31 ऑगस्टपर्यंत कायम, केंद्राच्या राज्यांना सूचना

loading image
go to top