फडणवीस दाऊदच्या माणसासोबत? नवाब मलिकांच्या मुलीच्या ट्विटने खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sana Malik New Tweet

फडणवीस दाऊदच्या माणसासोबत? मलिकांच्या मुलीच्या ट्विटने खळबळ

मुंबई : राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एका पेन ड्राईव्ह ब़ॉम्ब (Pen drive Bomb) फोडला आहे. फडणवीसांनी आज पुन्हा एकदा आज एक पुरावा सादर करत, महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक आणि वक्फ बोर्डावर गंभीर आरोप केले आहे. मात्र नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावत फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहे.

हेही वाचा: राणेंना पुन्हा नोटीस; "अनधिकृत बांधकाम काढा अन्यथा..."

फडणवीसांनी सादर केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये दोन पात्र आहेत. दोन पात्रांमधील संवादातून एकाचा दाऊदशी संबंध असल्याचं दिसून येतंय. यातील डॉ. मुदसैर लांबे (Mudassir थambe) यांना नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वक्फ बोर्डावर (Waqf Board) नियुक्त केलं असून, तो दाऊदचा (Dawood Ibrahim) माणूस असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. त्यानंतर सना मलिक यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. तसंच दाऊदशी संबंध असलेल्या आरोपीचा फडणवीसांसोबतचा व्हिडिओ सना मलिक यांनी ट्विट केला आहे.

हेही वाचा: प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा; म्हणाले, तेजस मोरेने सुपारी घेऊन..

काय म्हणाल्या सना मलिक?

"डॉ. लांबे यांची 13 सप्टेंबर 2019 रोजी फडणवीस/भाजप सरकारने वक्फ बोर्ड सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. महाविकास आघाडी सरकारची स्थापना नोव्हेंबर 2019 मध्ये झाली. माझ्या वडिलांना जानेवारी 2020 च्या पहिल्या आठवड्यात अल्पसंख्याक विभागाचा पदभार स्विकारला. तेव्हाच त्यांना वक्फ बोर्ड विभाग मिळाला. देवेंद्र फडणवीस डी-गँगच्या नातेवाईक आणि बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीसह" असं म्हणत सना मलिक यांनी हे ट्विट आहे. दरम्यान, या आरोपांनंतर देवेंद्र फडणवीस आता नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Web Title: Devendra Fadnavis With Mudassir Lambe Sana Malik New Tweet In Dawood Connection

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Devendra Fadnavis
go to top