Devendra Fadnavis : तुम्हीच आमचे मुख्यमंत्री; फडणवीसांसमोर नवनीत राणांचं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : तुम्हीच आमचे मुख्यमंत्री; फडणवीसांसमोर नवनीत राणांचं विधान

अमरावती - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीच्या दौऱ्यावर होते. या कार्यक्रमाला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा देखील उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर आणि आधीच्या सरकारवर कडाडून टीका केली. मात्र या कार्यक्रमातील नवनीत राणा यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे. (Devendra Fadnavis news in Marathi)

हेही वाचा: Modi Cabinet : BHIM UPI च्या ट्रांजॅक्शनवर मिळणार इन्सेटिव्ह; वाचा महत्त्वाचे निर्णय

या कार्यक्रमात नवनीत राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केलं. त्या म्हणाल्या की, गोवा असो वा गुजरात जिथे-जिथे देवेंद्रजींचे पाय पडतात, तिथे-तिथे ते न्यायासाठी लढतात. त्यामुळे त्यांच्या पाठिशी आपण उभं राहिलं पाहिजे. मात्र देवेंद्रजी सर्वांना उपमुख्यमंत्री वाटतात, पण आमच्यासाठी मुख्यमंत्री तुम्हीच आहात, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं.

हेही वाचा: Auto Expo 2023 : आजपासून वाहन मेळा सुरू; लोकेशन, तिकीटाची किंमत जाणून घ्या

मागील काही दिवसांपासून विरोधक देखील सरकारमध्ये मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असल्याची टीका करतात. तसेच अनेक भाजपनेते देखील अशी विधाने करतात. त्यामुळे सरकारमध्ये मुख्यमंत्री नेमकं कोण असा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. मात्र आज अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी फडणवीसच आमच्यासाठी मुख्यमंत्री असल्याचं सांगून एकप्रकारे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व नाकारल्याचं चित्र आहे.

दरम्यान यावर शिंदे गटाकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.