
Auto Expo 2023 : आजपासून वाहन मेळा सुरू; लोकेशन, तिकीटाची किंमत जाणून घ्या
Auto Expo 2023 : कित्येक वर्ष ज्याची उत्सुकता होती तो ऑटो एक्स्पो आजपासून सुरू होत आहे. करोनाच्या तडाख्यामुळे पडलेल्या तीन वर्षांच्या गॅपनंतर हा इव्हेंट परत येत आहे. दिल्लीमध्ये ऑटो एक्स्पो दोन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केला जातोय. यातील प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे ऑटो एक्सपो कंपोनंट शो आणि ग्रेटर नोएडा येथे ऑटो एक्सपो मोटर शो असणार आहे. आम्ही तुम्हाला कार्यक्रमाच्या तिकीटाची सर्व माहिती देऊ.
हेही वाचा: Yoga At Night : शांत झोपेसाठी रोज रात्री झोपण्याआधी करा फक्त हे आसन
ऑटो एक्स्पो तारीख आणि वेळ
11 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान ऑटो एक्स्पो होणार आहे. 11 जानेवारी आणि 12 जानेवारी हे पहिले दोन दिवस माध्यमांसाठी राखीव आहेत. ते 13 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत व्यावसायिकांसाठी खुले राहणार आहे. हा कार्यक्रम 14 ते 18 जानेवारी दरम्यान सर्वसामान्यांसाठी खुला असेल. ऑटो एक्सपो दररोज सकाळी 11 वाजता सुरू होईल. 14-15 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता, 16-17 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 आणि 18 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता बंद होण्याची वेळ आहे.
हेही वाचा: Travel Tips : हिवाळ्यात हवीय उन्हाळ्याची मज्जा ?या हॉट स्प्रिंग्स डेस्टिनेशनला नक्की भेट द्या
ऑटो एक्सपोमध्ये कोणत्या कंपन्या सहभागी होतील
ऑटो एक्सपो 2023 मध्ये मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर इंडिया, टाटा मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर मोटर, किआ इंडिया, एमजी मोटर इंडिया आणि रेनॉल्ट इंडिया सारख्या उत्पादकांच्या अनेक कार अनावरण केल्या जातील. याशिवाय अनेक इलेक्ट्रिक कारही सादर करण्यात येणार आहेत. यात एक्स्पोझिशन लॉबी, अॅडव्हेंचर झोन, टेक्नॉलॉजी झोन, स्टुडिओ झोन, लॉन्च झोन, एंटरटेनमेंट झोन आणि सस्टेनेबिलिटी झोन यांचा समावेश असेल.
हेही वाचा: Winter Health Care : हिवाळ्यात जास्त पाणी पिता? सावधान, ओढावू शकतो मृत्यू
ऑटो एक्सपो तिकीट किंमत
13 जानेवारीसाठी ऑटो एक्सपो 2023 ची किंमत 750 रुपये ठेवण्यात आले आहे. 14 आणि 15 जानेवारीचा तिकीट दर 475 रुपये आहे, तर कार्यक्रमाच्या शेवटच्या तीन दिवसांचा तिकीट दर 350 रुपये आहे. तुम्ही या इव्हेंटची तिकिटे BookMyShow वेबसाइटवर खरेदी करू शकता.