"देवेंद्रजी तुम्हाला काम झेपत नसेल तर सरळ राजीनामा द्या" अंधारेंची फडणवीसांवर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shiv sena Sushma Andhare  her security claimed her life is in danger

"देवेंद्रजी तुम्हाला काम झेपत नसेल तर सरळ राजीनामा द्या" अंधारेंची फडणवीसांवर टीका

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत संभाजी भिंडे आणि अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. गेल्या काही दिवसांपुर्वी संभाजी भिंडे यांनी महिला पत्रकाराला टिकली वरून वादग्रस्त विधान केलं होत. तर सोमवारी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बोलताना शिवीगाळ केली होती.

त्यांच्यावर त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एक शब्द देखील काढत नाही, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी टीका केली. तर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांना राजीनामाच मागितला त्या म्हणाल्या" देवेंद्रजी या सगळ्यांवर कारवाई करता येत नसेल तर राजीनामा द्या, तुम्हाला काम झेपत नसेल तर सरळ राजीनामा द्या" तर त्यांनी महिला आयोगाल विनंती केली की गुलाब पाटील, अब्दुल सत्तार यांच्या विरोधात नोटीसा काढा त्यांच्यावर कारवाही करा.

हेही वाचा: कर्ज परतफेडीच्या नियोजनाचे पाच मार्ग...

भाजपचा महिलांन बद्दलचा दृष्टिकोन हिन देणे आणि त्यांच्या बद्दल गरळ ओकेने हाच आहे. देवेंद्रजी तुम्ही अमृता फडणवीस यांना टिकली वरुन बोलता का. गुलाबराव पाटलांवर बोलताना अंधारे म्हणाल्या "गुलाबराव पाटील त्यांच्या वादग्रस्त विधानाने खुपच कुप्रसिद्ध असतात. तर नारायण राणे यांची मुलं जाणीवपूर्वक मातोश्री ठाकरे गटांच्या महिलांबद्दल वादग्रस्त बोलतात. त्यावर देवेंद्रजी तुम्ही काय बोलणार आहे का.