'मी ओबीसी असूनही मराठा बांधवासाठी आरक्षण मागतोय'

Tuesday, 27 November 2018

गेले 22 वर्ष मी मराठा आरक्षणासाठी लढतोय हीच खरी भाजपची पोटदुखी आहे. मी ओबीसी असूनही माझ्या मराठा बांधवांसाठी आरक्षण मागतोय म्हणूनच भाजप जातीयवादाचं गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

मुंबई- गेले 22 वर्ष मी मराठा आरक्षणासाठी लढतोय हीच खरी भाजपची पोटदुखी आहे. मी ओबीसी असूनही माझ्या मराठा बांधवांसाठी आरक्षण मागतोय म्हणूनच भाजप जातीयवादाचं गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
 

मराठा आरक्षण देण्याबाबत सरकारच्या मनात पाप आहे. धनगर आरक्षणाबाबतचा टीसचा अहवाल सरकार लपवून ठेवत आहे, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे. त्याचबरोर, शेतकऱ्यांची बाजू मांडताना त्यांनी म्हटले आहे की, बोंडअळीची 100% नुकसान भरपाई मिळालेला एकही शेतकरी नाही. हे सरकार फसवे आहे. मदत मिळालेला एकतरी शेतकरी दाखवा नाहीतर राजीनामा द्या असे थेट आव्हानच त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.
 

तसेच, पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की, सरकार म्हणत आहे की, चर्चा करायची आहे. सरकारला कसली चर्चा करायची आहे? सरकारची कर्जमाफी फसवी आहे, मराठा, धनगर समाजाला आरक्षणापासून या सरकारने वंचित ठेवले आहे. आता काय चर्चा करणार. आधी आरक्षणाचा अहवाल सरकारने सदनात ठेवायला हवा. तेव्हाच, सभागृह चालू देवू असा इशारादेखिल त्यांनी यावेळी विधानपरिषदेत सरकारला दिला आहे.
 

दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावरुन आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये चांगलीच जुंपली होती. हा तिढा सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीतही कोणताच तोडगा निघाला नाही. मराठा आणि धनगर आरक्षणाबाबतचे अहवाल तात्काळ सभागृहात सादर करावेत, या भूमिकेवर विरोधक आग्रही आहेत. सरकार अहवाल मांडत नसल्याने मराठा, ओबीसी समाजात संभ्रमावस्था आहे, सरकारच्या मनात पाप आहे, असा आरोपही विरोधकांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhanajay mundhe Criticises on BJP Government On maratha Reservation Issue