डॉक्टरसमोरंच हृदय पडलं बंद अन्...; Video पाहून बसेल धक्का

हृदयविकाराचा झटका आलेल्या रूग्णाला डॉक्टरांनी असं वाचवलं; पाहा Video
Viral Video
Viral VideoSakal

कोल्हापूर : डॉक्टरांच्या केबिनमध्ये बसलेल्या रूग्णाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि समोर बसलेला डॉक्टर देवदूत म्हणून अवतरला. कोल्हापूरातील एका घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला असून डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सदर रूग्णाचा जीव वाचला आहे. डॉ. अर्जुन अडनाईक असं या डॉक्टरांचे नाव असून या घटनेचा व्हिडिओ भाजपचे राज्यसभेवरील खासदार धनंजय महाडिक यांनी शेअर केला आहे.

(Dhananjay Mahadik Shared Video of Doctor Who Save Patient Life)

महाडिक यांनी त्यांच्या ट्वीटरवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये डॉक्टरांच्या केबिनमध्ये तिघे आणि डॉक्टर असे चौघेजण होते. त्यातील एका रूग्णाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्याने मान टाकून दिल्याचं व्हिडिओत दिसतंय. त्यानंतर समोर बसलेला डॉक्टर उठून धावत रूग्णाकडे गेल्यामुळे आणि तत्परता दाखवल्यामुळे रूग्णाचा जीव वाचला आहे.

दरम्यान, भाजपचे खाजदार धनंजय महाडिक यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून "हा व्हिडिओ आपल्या जवळपास असलेल्या हिरोचे उदाहरण दाखवतो. एका रुग्णाचे प्राण वाचवणारे कोल्हापुरातील डॉ. अर्जुन आडनाईक, हे एक उत्तम हृदयरोगतज्ज्ञ आहेत. अशा वीरांना मी दाद देतो." असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com