
Karuna Munde: धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आपणच आहोत, असा दावा करुन वांद्रे कौटुंबिक न्यायालयात करुणा मुंडे यांनी केस जिंकली होती. पुढे जिल्हा कोर्टानेही खालच्या कोर्टाचा निर्णय कायम ठेवला होता. मात्र धनंजय मुंडे यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हायकोर्टात खालच्या कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली खरी मात्र करुणा मुंडेंना ५० टक्के आणि त्यांच्या मुलीला १०० टक्के पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण ३३ महिन्यांपासून कोर्टात आहे, तेव्हापासूनची पोटगी धनंजय यांना द्यावी लागेल. या निर्णयाविरोधात अपिल करण्याचा अधिकार करुणा मुंडेंना असणार आहे.