esakal | धनंजय मुंडे यांच्यासह पाच आमदार आहेत तरी कुठे?

बोलून बातमी शोधा

dhananjay munde

परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे यांच्यासह पाच आमदारांचे फोन लागत नसून, सध्या ते आहेत करी कुठे? अजित पवार यांच्या आजच्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा आहे का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

धनंजय मुंडे यांच्यासह पाच आमदार आहेत तरी कुठे?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणेः परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे यांच्यासह पाच आमदारांचे फोन लागत नसून, सध्या ते आहेत करी कुठे? अजित पवार यांच्या आजच्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा आहे का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. शिवाय, धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांना गुरूवारी भेटल्याची माहिती समोर येत आहे.

राजभवनात आज (शनिवार) सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या. मात्र, शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवारांच्या पाठिशी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी धनंजय मुंडे यांच्या घरी गेली असता, ते घरी नसून मित्राकडे गेले असल्याचे सांगण्यात आले. यामुळे नेमके कोणत्या मित्राकडे गेले आहेत. शिवाय, राजकीय घडामोडींनी वेग घेतला असताना ते नॉट रिचेबल झालेच कसे? त्यांच्यासह पाच आमदार नॉट रिचेबल असल्यामुळे चर्चांना उधाण येत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्ष नेते पदी अजित पवार यांची निवड झाल्यावर सर्वाधिक धनंजय मुंडे हे सर्वाधिक आनंदी झाले होते. शिवाय, त्यांनी शिट्टीही वाजवली होती. त्यामुळे त्यांचा अजित पवार यांना मोठा पाठिंबा असल्याचे संकेत त्यावेळी दिले होते. धनंजय मुंडे हे देखील भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. आता ते पुन्हा स्वगृही जातील अशी चर्चाही सुरू झाली आहे.