सत्तास्थापनेच्या नाट्याला कलाटणी, धनंजय मुंडे शरद पवारांकडे परतले

टीम ई-सकाळ
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

- सकाळपासून 'नॉट रिचेबल' असलेले धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या बैठकीत राहणार उपस्थित.

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार धनंजय मुंडे हे सुमारे साडेनऊ तासांपर्यंत 'नॉट रिचेबल' होते. त्यानंतर आता ते माध्यमांसमोर आले असून, राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शपथविधी सोहळ्यानंतर परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे यांच्यासह पाच आमदारांचे फोन लागत नव्हते. त्यामुळे सध्या ते आहेत तरी कुठं? अजित पवार यांच्या आजच्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा आहे का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. शिवाय, धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांना गुरूवारी भेटल्याची माहिती समोर येत आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले मोठे विधान; म्हणाले...

माध्यमांचे प्रतिनिधी धनंजय मुंडे यांच्या घरी गेली असता, ते घरी नसून मित्राकडे गेले असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे नेमके कोणत्या मित्राकडे गेले आहेत. शिवाय, राजकीय घडामोडींनी वेग घेतला असताना ते नॉट रिचेबल झालेच कसे? त्यांच्यासह पाच आमदार नॉट रिचेबल असल्यामुळे चर्चांना उधाण येत होते. 

दरम्यान, या सर्व राजकीय घडामोडीनंतर आता धनंजय मुंडे समोर आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसाठी ते उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्यांनी इतर कोणता संदेश आणला नाही ना हे आता पाहणे महत्त्वाचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde arrive to meet NCP Chief Sharad Pawar