
महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी नुकतेच मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक वाल्मिक कराड याच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे. यानंतर मुंडेंवर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला होता. धनंजय मुंडेंवर आरोप केले जात आहेत. हे आरोप भाजप आमदार सुरेश धसांकडून केले जात आहे. यावर आता धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.