Dhananjay Munde Challenges Alimony Order : धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा ( करुणा मुंडे) यांच्यासोबत भावनिक आणि मानसिक हिंसाचार केल्याचं म्हणत त्यांना पोटगी खर्च देण्याचे आदेश काही दिवसांपूर्वीच दंडाधिकाऱ्यांनी दिले होते. या आदेशाला आता धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. दंडाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश अयोग्य आहे, असं त्यांनी या पूर्नविचार याचिकेत म्हटलं आहे.