Dhananjay Munde: पुन्हा मंत्रिमंडळात येण्याची मुंडेंना अपेक्षा; आधीच करुन ठेवली तयारी, करुणा मुंडेंनी मुद्द्यावर ठेवलं बोट

Santosh Deshmukh Case: ''संजय राठोड यांचं मंत्रिपद आरोपांमुळे गेलं होतं. नंतर त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळालं. तशीच अपेक्षा धनंजय मुंडेंची असेल त्यामुळे ते आजारपणाचं कारण देऊन राजीनामा देत आहेत.''
karuna munde
karuna mundeesakal
Updated on

Karuna Munde: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारतानाचे फोटो सोमवारी रात्री समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. त्यानंतर मंगळवारी धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घेतला गेला. मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितल्याचं वृत्त आलं. त्यानंतर मुंडेंचे काही लोक मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि त्यांनी राजीनामा सुपूर्द केला.

राजीनामा दिल्यानंतर फडणवीसांनी माध्यसमोर येत धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारल्याचं म्हटलं. शिवाय पुढील कार्यवाहीस्तव हा राजीनामा राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे. या सगळ्या राजीनामा अंकात धनंजय मुंडेंनी कुठेही नैतिकतेचा उल्लेख केला नाही. उलट प्रकृतीचं कारण सांगत राजीनामा देत असल्याचं म्हटलं.

karuna munde
Viral Video : अख्खा नागमणी आता आपलाय! महिलेचा नागीन डान्स बघून नेटकरीही हैराण, हसून-हसून तुमचंही पोट दुखेल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com