

Karuna Munde: करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या कौटुंबिक वादात आता कोर्ट मध्यस्थी करणार आहे. निवृत्त न्यायाधीशांमार्फत हे मेडिएशन चालणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय दिल्याचं स्वतः करुणा मुंडे यांनी सांगितलं. बीडमध्ये त्या 'साम टीव्ही'शी बोलत होत्या. कौटुंबिक न्यायालयाने पोटगीचा निर्णय करुणा यांच्या बाजूने दिला होता. पुढे सत्र न्यायालयाने तो निर्णय कायम ठेवला. मात्र धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.