
मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होण्यासाठी करुणा मुंडे मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी धनंजय मुंडेंचीआमदारकी रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तुझे १८ तुकडे करुन तुला संपवेन अशी धमकी धनंजय मुंडे यांनी दिल्याचा दिल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. याचे कॉल रेकॉर्डिग असून लवकरच कोर्टात सादर करणार असल्याचे त्यांनी साम टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.