

Ranjeet Kasle: बडतर्फ पीएसआय रणजित कासलेने केलेल्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करायचा होता, असा कासलेचा दावा आहे. तर दुसरीकडे ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यासाठी मला दहा लाख रुपये देण्यात आले होते, असंही कासलेने म्हटलं आहे.