dhananjay munde
esakal
महाराष्ट्र बातम्या
Dhananjay Munde: ओबीसी मेळाव्यातून पंकजा मुंडे टार्गेट? गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडेंना देण्याची भाषा; भुजबळांच्या डोक्यात काय शिजतंय?
Beed OBC Melava Dhananjay Munde Pankaja Munde: दिवंगत ओबीसी नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा धनंजय मुंडे यांच्याकडे देण्याची खेळी भुजबळ खेळत आहेत का? बीडच्या मेळाव्यातून भुजबळांना नेमकं काय म्हणायचं होतं?
Pankaja Munde: बीडमध्ये शुक्रवारी झालेला ओबीसी मेळावा दिसतो तेवढा सरळ-सोपा नव्हता. या मेळाव्याचे अनेक अर्थ आहेत. परंतु एक महत्त्वाची आणि लक्षवेधी ठरलेली बाब म्हणजे स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा. छगन भुजबळ यांनी स्व. मुंडेंचा वारसा धनंजय मुंडे यांनी स्वीकारावा, असं आवाहन केलं. ओबीसी मेळाव्यापासून दूर राहिलेल्या पंकजा मुंडे यांना धक्का देणारी भुजबळांची ही खेळी म्हणावी लागेल.

