
पक्षसंघटना आणि राज्यातील विविध मुद्द्यांवर राष्ट्रवादीच्या (NCP) बैठकीत गुरुवारी चर्चा झाली. यामध्ये नवाब मलिक (Nawab Malik) याचं मंत्रिपद कायम ठेवण्यात आलं आहे. पण त्यांच्याकडील खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. (Narendra Rane and Rakhi Jadhav - Jayant Patil as working presidents of Mumbai NCP)
जयंत पाटील म्हणाले, "नवाब मलिक यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आल्यानं ते उपलब्ध नाहीत. त्यामुळं पक्ष संघटनेच्या येणाऱ्या निवडणुका आणि पक्षांतर्गत बाबींची हाताळणी इतरांकडे सोपवण्यात आली आहे. यामध्ये मलिकांचं पालकमंत्रीपदं असलेल्या जिल्ह्यांपैकी परभणीच्या पालकमंत्रीपदी धनंजय मुंडे यांची तर गोंदियाच्या पालकमंत्रीपदी प्राजक्त तनपुरे यांची शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल" त्याचबरोबर मलिकांच्या अल्पसंख्यांक मंत्रीपदाची जबाबदारी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे तर कौशल्यविकास खात्याची जबाबदारी राजेश टोपे यांच्याकडे देण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना चुकीच्या पद्धतीनं डांबून ठेवलं आहे. अनिल देशमुखांनी अटक झाल्यानंतर स्वतःहून राजीनामा दिला. नवाब मलिक यांची अटक चुकीच्या पद्धतीनं झाली आहे. त्यासाठी मलिक आणि त्यांचे कुटुंबिय लढत आहेत, त्यामुळं त्यांच्याकडील भार दुसऱ्या व्यक्तींवर सोपवण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. पण राज्याच्या अल्पसंख्यांक मंत्रीपदी ते कायम राहतील, असं स्पष्टीकरण यावेळी जयंत पाटलांनी दिलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.