ठाकरे सरकार कायम राहणार हे मान्य केल्याबद्दल फडणवीसांचे आभार - जयंत पाटील

जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला
Jayant Patil_Devendra Fadnvis
Jayant Patil_Devendra Fadnvis
Updated on

मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी सत्तेत येण्याबाबत केलेल्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मिश्किल शब्दात त्यांना टोला लगावला. महाविकास आघाडीचं सरकार (MVA Govt) कायम राहणार असल्याचं मान्य केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे आभार, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला. (Thanks to Devendra Fadnavis for agreeing that MVA govt will still remain in Maharashtra says Jayant Patil)

Jayant Patil_Devendra Fadnvis
नवाब मलिकांना पहिला धक्का! जबाबदाऱ्या घेतल्या काढून

जयंत पाटलांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारताना सांगितलं, नागपूर इथं बोलताना देवेंद्र फडणवीसांनी दावा केला की, २०२४ मध्ये भाजपचं सत्तेत येणार. यावर पाटील म्हणाले, "म्हणजेच २०२४ पर्यंत महाविकास आघाडीचं सरकार कायम राहणार असल्याचं त्यांनी मान्य केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो"

Jayant Patil_Devendra Fadnvis
शाळेच्या अभ्यासक्रमात शिकवली जाणार भगवद् गीता; गुजरात सरकारचा निर्णय

दरम्यान, महाविकास आघाडीचे आमदार फुटणारे नाहीत आणि आघाडी मजबूत आहे. महाराष्ट्रातील विरोधकांनी विरोधक म्हणून चांगलं काम करावं. त्या कामावरच ते पुढे निवडून येतील, असा आमचा त्यांना सल्ला आहे. त्यामुळं आमचं सरकार स्थिर असून कोणताही धोका नाही, असंही यावेळी जयंत पाटील म्हणाले.

पेनड्राईव्हचा खरेखोटेपणा तपासला पाहिजे

पेनड्राईव्हचा खरेखोटेपणा तपासला पाहिजे. फॉरेन्सिक लॅबमध्ये त्याची पडताळणी केली पाहिजे. त्यानंतरच त्यावर बोललं पाहिजे. आपण त्याआधीच आरोप लावतोय. एखाद्या वकिलानं म्हणजेच त्रयस्थ व्यक्तीनं जर भाष्य केलं असेल तर ते किती खरं खोटं धरायचं ही पुढची गोष्ट आहे. जर प्रत्येकजण असे पेनड्राईव्ह वापरायला लागले तर काम करणं मुश्कील होईल, अशी टिपण्णीही जयंत पाटील यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com