

धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. मुंडेचे पीए प्रशांत जोशी हे सातपुडा निवास्थानाच्या बाहेर पडून मुख्यंमत्र्यांच्या सागर बंगल्याकडे रवाना झाले. मुख्यमंत्री यांना तो राजीनामा स्वीकारला असून राज्यापालांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहून घेतला असल्याची माहिती समोर आली होती. अखेर आज त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. कालच राजीनामा देण्यास सांगितले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी देखील साम टिव्हीशी बोलताना दिली होती.