
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराडच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याआधी त्यांच्यावर करुणा शर्मा यांनी आरोप केल्यानं वादात अडकले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये सतत वादामुळे चर्चेत राहिलेल्या धनंजय मुंडे यांना मंत्रिपद गमवावं लागलं. आता मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे आता इगतपुरीतील विपश्यना केंद्रात दाखल झाले आहेत. मन:शांतीसाठी धनंजय मुंडे इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात गेल्या ८ दिवसांपासून आहेत.