गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंचे भावनिक ट्विट, पाहा...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 December 2019

बीडमधील गोपीनाथगडावर मुंडे समर्थकांचा मेळावा आज होत आहे. पंकजा मुंडे यांनी यानिमित्त ‘स्वाभिमान दिना’चं आयोजन केले आहे. त्याचवेळी गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही ट्वीट करुन आपले आप्पा अर्थात गोपीनाथ काकांच्या आठवणी जागवल्या आहेत.

बीड : भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी ट्विट करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. दरम्यान, आज गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर मेळावा घेत असून, यामध्ये ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

बीडमधील गोपीनाथगडावर मुंडे समर्थकांचा मेळावा आज होत आहे. पंकजा मुंडे यांनी यानिमित्त ‘स्वाभिमान दिना’चं आयोजन केले आहे. त्याचवेळी गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही ट्वीट करुन आपले आप्पा अर्थात गोपीनाथ काकांच्या आठवणी जागवल्या आहेत.

भाजपनेत्यांना मोठा धक्का; महाविकास आघाडी घेणार मोठा निर्णय

धनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे. संघर्षाचा… जनसामान्यांच्या कल्याणाचा… सदैव आपल्या आठवणीत! जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. या पोस्टसह धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोसमोर नतमस्तक झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. 

धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचंही वाढदिवसानिमित्त ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. ‘साहेब, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच प्रभू वैजनाथाच्या चरणी प्रार्थना!’ अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत. पवारांच्या वाढदिवसानिमित्त परळीत 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत ‘स्वाभिमान सप्ताह’ साजरा केला जात आहे, अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde tweet about Gopinath Munde birth anniversary