
Anil Deshmukh: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या जवळचे लोक आरोपी आहेत. त्यामुळे मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडने बीडमध्ये कायदा हातात घेऊन अनेक कुरापती केल्याचे प्रकार पुढे आलेले आहेत. पोलिसांनी हाताशी धरुन अनेक गुन्हे त्याने दडपवल्याचा आरोप यापूर्वी अनेकांनी केलाय.