एकच छंद गोपीचंद; लेखक, निर्माते पडळकरांविषयी जाणून घ्या...

Gopichand Padalkar
Gopichand Padalkar

भाजपमध्ये आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे गोपीचंद आहेत तरी कोण याविषयी जाणून घेऊया. गोपीचंद हे भाजपमधील एक तरुण नेतृत्व आहे. धनगर समाजाचे नेतृत्व करीत असल्याने त्यांचे पक्षातील स्थान तसे महत्त्वाचे आहे. खरे तर ते पहिले महादेव जानकरांचे कार्यकर्ते. सध्या ते ज्या खानापूर-आटपाडी तालुक्‍यातून नेतृत्व करतात, तेथे एकापेक्षा एक नेत्यांशी त्यांना टक्‍कर द्यावी लागते. 
धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

लोकसभेवेळी सांगलीत भाजप, स्वाभिमानी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी आणि लक्षवेधी लढत झाली होती. सांगलीत भाजपकडून संजयकाका पाटील, स्वाभिमानीकडून विशाल पाटील रिंगणात होते. संजयकाका पाटील पाच लाख आठ हजार मतं मिळवत विजयी झाले होते. स्वाभिमानीचे विशाल पाटील 3 लाख 44 हजार मतांनी दुसऱ्या क्रमांकावर होते. तर पडळकरांनाही तीन लाख मतं मिळाली होती. धनगर समाजाच्या गळ्यातील ताईत म्हणून ते ओळखले जातात. त्यांची इन्ट्री होताच एकच छंद गोपीचंद आशा घोषणा दिल्या जातात 

गोपीचंद पाडळकर हे दुष्काळी भागातल्या आटपाडीचे आहेत. या आटपाडीतलं पडळकरवाडी हे त्यांचं गाव, ज्याचं वैशिष्टय म्हणजे इथल्या एकूण 100 कुटुंबांमध्ये 40 जण डॉक्टर आहेत. खानापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोनदा निवडणूकही लढवली आहे. 2009 मध्ये 'रासप'चे रिपब्लिकन डावे लोकशाही आघाडीतले उमेदवार मधून आणि 2014 मध्ये भाजपतर्फे पराभूत झाले, पण त्याच वेळेस वाढत गेलेल्या धनगर आरक्षण आंदोलनात त्यांचं नेतृत्व पुढे येत गेलं. 2012 पासून ते आंदोलनात जास्त सक्रीय झाले.

पाडळकरांचं राजकारणाव्यतिरिक्त नवं काम म्हणजे ते चित्रपटाचे लेखक, निर्माते आणि अभिनेतेही झाले आहेत. त्यांचा पहिला मराठी चित्रपट 'धुमस' असून त्यात त्यांनी महत्वाची लीड भूमिका केली आहे आणि आता ते बारामती मधून निवडणूक लढवत  आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com