Dhangar Reservation file photosakal
महाराष्ट्र बातम्या
Dhangar Reservation: मुख्यमंत्री म्हणतात देऊ, पण महायुतीतच धनगर आरक्षणाला विरोध!; 'या' नेत्यानं स्पष्ट केली भूमिका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातींत प्रवेशाबाबत सकारात्मक पावलं उचलली जातील असं आश्वासन दिलं होतं.
मुंबई : मराठा आरक्षणाबरोबरच धनगर आरक्षणाचा मुद्दाही महाराष्ट्रात तापायला लागला आहे. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातींत प्रवेशाबाबत सकारात्मक पावलं उचलली जातील असं आश्वासन दिलं होतं. पण आता महायुतीतूनच धनगर आरक्षणाला विरोध होताना दिसतो आहे. त्यामुळं हा विषय चिघळण्याची चिन्हं आहेत.