
Viral Video: आमदार सुरेश धस यांचा पीए असल्याचे सांगत अधिकाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्याला धाराशिवमध्ये चोप देण्यात आला आहे. मराठा जनआक्रोश मोर्चाच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडून पैसे मागत असल्याचे लक्षात येताच मराठा आंदोलकांनी त्याला चांगलाच चोप दिला, त्यानंतर त्याला पोलिसांत स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे. या ठगाला चोप देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.