'नरेंद्र मोदींमध्ये पंतप्रधान बनण्याची क्षमता'; असं म्हणणारे राज ठाकरे पहिले नेते; भाजप नेत्यांच्याही नव्हते गावी?

Raj Thackeray MNS-BJP alliance? राज ठाकरे यांनी याआधी अनेकदा तळ्यात-मळ्यात भूमिका घेतल्या आहेत. नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याबाबत त्यांची अशीच भूमिका होती.
narendra modi raj thackeray
narendra modi raj thackerayesakal

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेमध्ये युतीबाबत चर्चा झाल्याचं बोललं जातं. लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये कसे सूत्र असेल, हे स्पष्ट झाल्यानंतर अधिकृतरित्या युतीची घोषणा केली जाऊ शकते. (Dhaval Kulkarni journalist book on Thackeray)

राज ठाकरे यांनी याआधी अनेकदा तळ्यात-मळ्यात भूमिका घेतल्या आहेत. नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याबाबत त्यांची अशीच भूमिका होती. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना राज ठाकरे यांनी गुजरात दौरा केला होता. राज्यामध्ये झालेली विकासकामे आणि तेथील सादरीकरण पाहून राज ठाकरे भारावले होते. त्यावेळी त्यांनी मोदींचे तौंडभरुन कौतुक केले होते. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाच्या क्षमतेचे नेते असल्याचं पहिल्यांदा त्यांच्याच तोंडून निघालं होतं असं म्हटलं जातं.

narendra modi raj thackeray
SAKAL Special : चालता-बोलता! राज ठाकरे यांना राम पावणार

राजकीय विश्लेषक सांगतात की, मनसेचा भाजपसोबत युती करण्याचा कितपत फायदा होईल हे येता काळच सांगू शकेल. राज ठाकरे यांनी गेल्या काही काळात पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर अनेकदा कडवट टीका केली आहे. व्यंगचित्रांच्या माध्यमातूनही त्यांनी मोदी-शहांवर निशाणा साधलाय. राज ठाकरे यांची टीका टोकाची असायची. त्यामुळे ते आता याला कसं सामोरं जातील हे पाहावं लागणार आहे.

भाजपला हवाय एक ठाकरे

राजकारणामध्ये युती आणि आघाडीचे गणित हे फायदा पाहून केले जाते. सध्या मनसे आणि भाजप या दोघांना युतीची आवश्यकता आहे. त्यामुळे ते आता एकत्र येण्याचा विचार करत आहेत. भारतीय जनता पक्षाला सध्या त्यांच्या बाजूने एक 'ठाकरे' हवा आहे. त्याची तरतूद ते राज ठाकरेंना जवळ करुन करणार आहेत. शिवाय भाजपचा राज्यातील प्रयोग फसलाय. एका रिक्षावाल्याला मुख्यमंत्री केले म्हणून त्याचा राजकीय फायदा होईल असं भाजपला वाटत होतं, पण तसं होईल अशी शक्यता कमी आहे. भाजपने धोक्याची घंटा ओळखून राज ठाकरेंकडे हात पुढे केला आहे.

narendra modi raj thackeray
Raj Thackeray : राज ठाकरे दिल्लीला रवाना, महायुतीमध्ये जाण्याचे संकेत? फडणवीस, बावनकुळेही दिल्लीत...

राज ठाकरे हे करिष्मॅटिक नेते आहेत. उद्धव ठाकरेंवर थेट टीका करण्याची त्यांची जेवढी क्षमता आहे, तिकती इतर कोणत्याही नेत्यामध्ये नाही. पण, विरोधाभास असा की, त्यांची संघटना मजबूत नाही. शिवाय मत घेण्याची त्यांची क्षमता अजून तरी दिसून आलेली नाही. कधीकाळी विधानसभेत १३ जागा मिळालेल्या मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव याआधीही भाजपकडे होता. भाजप नेते विनोद तावडे यांनीच तसा प्रस्ताव ठेवला होता. पण, उद्धव ठाकरे आणि इतर काही भाजप नेत्यांनी विरोध केल्याने राज ठाकरेंना सोबत घेण्यात आलं नव्हतं, असं राजकीय विश्लेषक सांगतात.

गुजरात दौऱ्यात विकासकामे पाहून 'राज' भारावले

धवल कुलकर्णी यांच्या 'ठाकरे विरुद्ध ठाकरे' या पुस्तकामध्ये राज ठाकरे हे कसे नरेंद्र मोदींबाबत अनुकूल झाले होते हे सांगण्यात आलंय. पुस्तकात असा उल्लेख आहे की, 'काँग्रेस पक्षातील एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, भाजपमधील काही नेते शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करत होते. त्यांना सांगितलं जात होतं की, नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक वाढवा. मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते.मोदी आणि राज यांच्या दोघांमध्ये एक गोष्ट समान होती ती म्हणजे सत्तावादी विकासावर श्रद्धा.'

narendra modi raj thackeray
Raj Thackeray Pune: राज ठाकरे पुण्यात बैठक न घेता संतापून का निघून गेले? पडद्यामागे नेमकं काय घडलं? सविस्तर वाचा...

'२००७ मध्ये जेव्हा मनसे जास्त प्रसिद्ध नव्हता, त्यावेळी राज ठाकरे यांचे दूत म्हणून शिशिर शिंदे हे मोदी यांना भेटायला गेले होते आणि त्यांनी राज ठाकरे यांचे शुभेच्छा पत्र मोदींना दिले होते.ऑगस्ट २०११ मध्ये राज ठाकरे यांनी तज्त्रांच्या एका टीमसोबत राज्य अतिथी म्हणून गुजरातचा दौरा केला होता. मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या अनेक योजनांची त्यांनी पाहणी केली होते. तेथील विकासकामे पाहून त्यांनी मोदींचे कौतुक केले होते. त्यांनी मोदींसारखे मुख्यमंत्री मिळण्यासाठी गुजरातच्या जनतेला भाग्यशाली म्हटलं होतं', असं पुस्तकात म्हणण्यात आलंय. २०११ मध्ये राज ठाकरे यांनी मोठी चूक केली होती असं मत पुस्तकात व्यक्त करण्यात आलं आहे.

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांमध्ये पंतप्रधान बनण्याची क्षमता

'राज ठाकरे पहिले नेते होते जे म्हणाले होते की, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांमध्ये पंतप्रधान बनण्याची क्षमता आहे. एका वरिष्ठ भाजप नेत्यांनी लक्ष वेधलं की, जेव्हा राज ठाकरे यांनी पंतप्रधानपदासाठी मोदी यांचे नाव घेतले तोपर्यंत भाजपमध्ये देखील याची औपचारिकरित्या कोणतीही मागणी झाली नव्हती.' असाही उल्लेख पुस्तकात आहे.

'संजय निरुपम यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील अनेक लोक राज्यातील गुजरातींचा वाढता प्रभाव यामुळे खुश नव्हते. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदारांचा एक गट राज ठाकरे यांच्या पक्षापासून दूर गेला होता. मनसेकडील एक गट भाजपकडे गेल्याची जाणीव होताच राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका सुरु केली. पण, तोपर्यंत मोदी पंतप्रधान झाले होते. मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण केले नाही ही त्याची प्रमुख टीका होती.', असा उल्लेख पुस्तकात आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com