Nagar Parishad-Nagar Panchayat Elections Result : मतदान झालं, निकाल लागतोय; पण नगरपंचायत-नगरपरिषद यात फरक तरी काय?

Difference Between Nagar Panchayat and Municipal Council: नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र खूप लोक या शब्दांमध्ये गोंधळतात. स्थानिक प्रशासनाच्या रचनेतील फरक समजून घ्या
Nagar Panchayat–Municipal Council

Nagar Panchayat–Municipal Council

esakal

Updated on

Muncipal Corporation Election:

राज्यातील 288 नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचा निकाल आज रविवार 21 डिसेंबर रोजी जाहीर होत असून, राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या निकालांच्या गदारोळात अनेक नागरिकांना नगरपरिषद आणि नगरपंचायत यातील नेमका फरक काय, हे अद्याप स्पष्टपणे माहीत नाही. लोकसंख्या, प्रशासकीय अधिकार, विकासकामांची जबाबदारी आणि शासनाकडून मिळणारा निधी या बाबींवरून या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फरक केला जातो. नगरपंचायत ही साधारणपणे ग्रामीण भागातून शहरीकरणाकडे वाटचाल करणाऱ्या भागासाठी असते, तर नगरपरिषद ही अधिक लोकसंख्या व विकसित शहरी भागासाठी स्थापन केली जाते. हा फरक समजून घेतल्यास स्थानिक प्रशासनाची रचना, नागरिकांची भूमिका आणि निवडणुकांचे महत्त्व स्पष्टपणे लक्षात येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com