Maharashtra analog paneer ban explained
esakal
राज्य सरकारने अॅनालॉग पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, विक्री आणि वितरणावर पूर्णपणे बंदी घातली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, अशावेळी हे पनीर नेमकं काय आहे? ते खरंच आरोग्यासाठी धोकादायक आहे का? साधं पनीर आणि अॅनालॉग पनीर यात नेमका फरक काय? महत्त्वाचे म्हणजे अनालॉग पनीर ओळखायचं कसं? अस अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.