Eknath Shinde : मुंबईत मराठी माणसाला सन्मानाने घर; मुंबईबाहेर फेकला गेलेला मराठी माणूस परत मुंबईला आला पाहिजे
एकीकडे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिव्या द्यायच्या. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ द्यायचा. केमिकल लोचा झाला बहुधा, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उतर देताना विरोधी पक्षांवर टीका करतानाच उद्धव ठाकरे यांचाही समाचार घेतला.